बीड : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.
या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली असून खासदार प्रीतम मुंडे या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






