झुंजार प्रतिनिधी । एरंडोल :- नंदगाव तालुका एरंडोल येथील प्रौढाने घराचे शेजारी असलेल्या लोखंडी पत्र्याच्या शेड ला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत माहिती अशी की नंदगाव येथील दिलीप कथ्थू पाटील वय 57 वर्षे यांनी घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली
पहाटे चारच्या सुमारास मयताचा मुलगा शरद दिलीप पाटील या पत्राच्या शेड कडे गेला असता त्यास वडीलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. शरद पाटील यांनी घटनेची माहिती काका ज्ञानेश्वर कथ्थू पाटील यांना दिली ज्ञानेश्वर पाटील अधिकार पाटील वासुदेव पाटील यांचेसह ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन दिलीप पाटील यांना खाली उतरवुन
ग्रामीण रुग्णालयात नेले ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून ते मयत झाल्याचे सांगितले याबाबत ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार विकास देशमुख हे पुढील तपास करीत आहे
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






