झुंजार प्रतिनिधी । एरंडोल :- माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल अशी धमकी देऊन 17 वर्षीय मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलीस स्टेशनला दिली. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की गणेश नगर तांडा तालुका एरंडोल येथील सतरा वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली होती.
बेपत्ता असलेली तरुणी व एक युवक औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगर मध्ये असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. एरंडोल पोलिसांचे पथक औरंगाबाद येथील जोगेश्वरी नगर येथे गेले असता त्यांना सदर युवती व दिनेश बाबूलाल पवार हा युवक एका खोलीमध्ये आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही एरंडोल येथे आणले असता पीडित युवतीने आपबीती माहिती पोलिसांना दिली. दिनेश बाबुलाल पवार याने माझ्याशी लग्न कर अन्यथा मी गळफास घेऊन आत्महत्या करेल आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल अशी धमकी दिली.
घरात याबाबत कोणासही सांगायचे नाही असे देखील धमकावले तीन ऑक्टोंबर रोजी संशयित दिनेश पवार याने पीडितेस धमकावून औरंगाबाद येथे नेले. जोगेश्वरी नगर मध्ये भाड्याची खोली घेऊन पाच ते सहा वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केले.
याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संशय दिनेश बाबुलाल पवार यांचे विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश आहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. पोलिसांनी संशयित दिनेश पवार यास अटक केली आहे
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






