VIDEO : २९ प्रवाशांसह निघालेली खासगी बस पेटली, पुण्यात अग्नितांडव; पहाअंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Spread the love

पुणे :- सध्या महाराष्ट्रात बस अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये नासिक येथिल घटना ताजी असतानाच अश्यातच भीमाशंकर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना आज पहाटेला सात वाजता घडली आहे. कल्याणवरुन २९ प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक आग लागली. नाशिकमध्ये बसला आग लागल्याची घटना ताजी असताना भीमाशंकर येथे देखील प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बसला लागलेल्या आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. ही बस जाळून खाक झाली असून बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. बसला जेव्हा आग लागली तेव्हा बसमध्ये तब्बल २९ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

भीमाशंकर कडे जाणाऱ्या खाजगी बसने अचानक पेट घेतला आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ घडली आहे. बसमध्ये २७ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

पहा व्हिडिओ :

गेल्या काही दिवसांपासून पुणे – महामार्गावर बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होता की यात बसने पेट घेतला होता. यामध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने बसच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार