आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या प्रयत्नांना यश..! जयहिंद लोकचळवळ यांच्याकडून आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री येथे संगणक सुपूर्द .

Spread the love

पिंप्री – ता धरणगाव

आमदार डॉ सुधीर तांबे हे शैक्षणिक चळवळ साठी सतत कार्य करत असतात. तसेच शिक्षक व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न करत असतात .आपल्या कार्यात नेहमीच योग्य पाऊल उचलत ते सिद्ध होई पर्यंत प्रयत्न करत असतात. पिंप्री ता धरणगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेसाठी आज दि 11 ऑक्टोबर 2022 रोजी संगणक प्राप्त झाल्यानंतर मनस्वी समाधान व्यक्त करण्यात आले . मा श्री एस डी गुंजाळ सर यांच्या हस्ते एक संगणक संच संस्थेचे सचिव श्री विनोद चौधरी सर यांना सुपूर्द करण्यात आला . संस्थेच्या वतीने सचिव श्री विनोद चौधरी यांनी आमदार डॉ सुधीर तांबे साहेब व जयहिंद लोकचळवळ यांचे आभार मानले.

जर

यावेळी संस्था सचिव श्री विनोद चौधरी , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ व्ही एम चौधरी , उपशिक्षक , आर आर पावरा सर ,एस के शिंदे सर ,आर एस पाटील सर , एस ए पटेल सर , सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. संगणक मिळाल्या बद्दल विद्यार्थी व शिक्षकां मध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार