धरणगाव प्रतिनिधी:-(योगेश पाटील) सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य असलेल्या दुर्दम्य प्रतिष्ठान तर्फे आज अद्यावत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.खरे पाहता धरणगाव शहराची लोकसंख्या व त्यात शहरातील रुग्णसंख्या जर लक्षात घेतली तर आजचा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा हा खरच सामाजिक कार्याकडे वाहून घेणारा ठरला. सदरहू या रुग्णवाहिकेत रुग्णास लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा ह्या पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलेला दिसून येतो त्यात सर्वप्रथम ऑक्सिजन सिलेंडर, स्ट्रेचर त्याचप्रमाणे संपूर्ण रुग्णवाहिका ही वातानुकूलित असून इतरही सुविधा त्यात उपलब्ध आहेत.
प्रतिष्ठान तर्फे मागील कोरोना काळात सुद्धा रुग्णवाहिका देऊन अशीच धरणगावकरांची प्रतिष्ठान तर्फे मदत करण्यात आली होती व त्याचप्रमाणे आता पहिली जी रुग्णवाहिका आहे ती आता शव वाहिनी म्हणून उपयोगात आणणार आहोत असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे सचिव मंदार चौधरी यांनी केले. दुर्दम्य प्रतिष्टान यांच्या सहकार्याने धरणगाव परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदानशिबिर, आरोग्य शिबीर, युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व कोरोना काळात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले होते.
त्याच प्रमाणे प्रतिष्टान तर्फे करण्यात आलेली वृक्षारोपणे ही जगली पाहिजे म्हणून आदर्श क्रीडा शिक्षक श्री.कैलास माळी यांनी आपल्या स्वखर्चाने उन्हाळ्यात टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून वृक्षांना संजीवनी प्रदान केली तसेच शहरात देखील पाण्याची समस्या टँकरने मदत करून सोडविण्यासाठी सर अहोरात्र कार्यतत्पर होते हे सर्वश्रुत असून धरणगावकर जाणून आहेत.तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पण प्रा.श्री.आर.एन.महाजन सर (अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सामाजिक समरसता मंच)यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.मिलिंदजी डहाळे (अध्यक्ष,मेडिकल असोसिएशन धरणगाव), श्री.एम.एच.चौधरी (ता.संघ चालक) प्रमुख अतिथी म्हणून या प्रसंगी लाभले.

त्याच प्रमाणे दुर्दम्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.कैलास माळी , उपाध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव मंदार चौधरी व संचालक परेश काळे, सुधाकर वाणी,कैलास वाघ सर, प्रा.संजय शिंगाणे, दीपक चौधरी, योगेश महाजन सर, अजिंक्य जोशी व सौ.कविता महेश आहेराव उपस्थित होते. धरणगाव शहरातील सर्व नामांकित डॉक्टर व मेडिकलचे संचालक यांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली.या प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी आबा पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, ज्येष्ठ नेते शिरीष आप्पा, भानुदास विसावे, विजय महाजन, एस एस पाटील सर, जीवन पाटील सर,के.वाय चौधरी सर, आहेराव सर, किशोर शेठ, गुलाब बाबा, ललित येवले, भालचंद्र माळी ,गुलाब मराठे, कडू आप्पा बयस, सौ मनीषा कैलास माळी,मोरे मॅडम, आहेराव मॅडम, कन्हैया रायपुरकर ,सचिन पाटील, चंदन पाटील ,भाऊसाहेब पाटील, सुनील चौधरी, टोनी महाजन, कांतीलाल माळी, किरण वराडे, प्रथम सूर्यवंशी, किरण गुरव, भैया महाजन, गोपाल महाजन ,तुषार सुतार, भरत भाटिया ,ड्रायव्हर नानाभाऊ बागुल व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्दम्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मेहनत घेतली सचिव मंदार चौधरी यांनी सूत्रसंचालन केले अध्यक्ष कैलास माळी सर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले तसेच सुधाकर वाणी, अजिंक्य जोशी, कैलास वाघ सर, परेश काळे ,योगेश महाजन यांनी कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर शिंगाने सर यांनी केले. आजपासून रुग्णवाहिका धरणगाव परिसरातील रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध झाली असे दुर्दम्य प्रतिष्ठानच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
“सेवा परमो धर्म” या ब्रीद वाक्याला अनुसरून समाजसेवा करू व गरीब गरजूंना अद्यावत रुग्णवाहिकेची सुविधा व गरज लक्षात घेता हा लोकार्पण सोहळा प्रतिष्टान तर्फे खारीचा वाटा आहे ..! श्री मंदार चौधरी- सचिव दुर्दम्य प्रतिष्टान