अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर, शासनाच्या मदतीची अपेक्षा.

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- दि.09/10/11/12 सदरील चार दिवसापासून लोणार तालुक्यातील व परिसरातील सतत धार पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवा दिल झाला असून तोंडी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे.लोणार तालुक्यातील व परिसरातील सरस्वती,तांबोळा,किन्ही,धायफळ,दिपखेड, शिंन्दी,मातमळ,हिवरा,हत्ता गावामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या सोयाबीनचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.व झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे.या बिकट परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर येण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट 100% नुकसान भरपाई व 100% पीक विमा भरपाई द्यावी.अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली नाही तर शेतकरी राजा आपल्या मुलाबाळांसह आपल्या परिवारासोबत दिवाळी सारखा सर्वात मोठा असणारा सण साजरा करू शकणार नाही.

सतत धार पडणाऱ्या पाण्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन शेंगांना कोंब येत आहे तर काही शेतकऱ्यांनी कापलेल्या सोयाबीन पाण्यात सडत आहे.आधीच उसनवारी कर्जबाजारीपणा अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे या काळात शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. शासनाने पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार