घरकुल वसाहतीत निघालेला साप थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात

Spread the love

जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचा सवाल साहेब जीवित हानी झाल्यास जबाबदारी कोणाची निश्चित करा.

आर्वी/प्रतिनिधी/पियूष रेवतकर

आर्वी:-13 वर्षांपासून घरकुल वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोयी पुरवण्याची स्थानिक नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा मागणी. घरकुल वसाहतित राहणाऱ्या नागरिकांना रोज साप व सरपट नाऱ्या प्राण्याच्या दहशतीत जगावं लागत आहे मागील अनेक वर्षा पासून इलेक्ट्रिक कनेक्शन ची मागणी शासन प्रशासना कडे केली असून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत आहे या पूर्वी अतिशय विषारी जातीच्या कोब्रा सापाणी याच परिसरातील सुमन मोरेश्वर मडावी ह्यांना चावा घेतला होता तर काहीच दिवसांनी पुन्हा याच परिसरात राहणाऱ्या छोटी अंजुम हिला सुद्धा सर्प दंश झाला

असे एकना अनेक उदाहरणं इथे आहे इथं साप व सर्पटणारे प्राणी नित्याचेच निघतात अनेकांना दंश झाला आज सुद्धा याच परिसरात राहणाऱ्या निशा अजय थुल हिच्या घरी साप निघाला तेंव्हा तिथल्या नागरिकांनी व राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे, कार्याध्यक्ष कमलेश चिंधेकर यांनी घरकुल वासाहतीत निघालेला साप थेट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नेत साहेब यापुढे होणाऱ्या जीवित हानीची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करत दोन दिवसात कनेक्शन देण्याचे आदेश द्यावे अन्यथा आता निघालेले साप संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात सोडू असा इशारा दिला.

या गंभीर प्रकारची दखल घेत उपविभागीय अधिकारी धार्मिक साहेब यांनी वीज वितरण व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा केली व एनओसी देत मार्ग मोकळे करण्याचे कळवले तसेच सात दिवसात कनेक्शन देण्याची शाश्वती उपविभागीय अधिकारी तथा नप प्रशासक यांनी चर्चेअंती दिली यावेळी निवेदन देताना महिला जिल्हा उपाध्यक्षा सौं शुभांगी कलोडे, महिला आर्वी विधानसभा अध्यक्षा सौं प्रमिला हत्तीमारे, तालुका संघटिका सौं माधुरी सपकाळ, शहर संघटिका सौं रेखा वानखेडे, घरकुल वसाहतीत राहणाऱ्या नंदा नरोडे, प्रज्ञा हुमणे, कामगार सेल चे सुरेंद्र वाटकर, शंकर हत्तीमारे व स्थानिक नागरिक उपस्थित होते

याच्या सर्व कॉपी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे व युवक विधानसभा कार्याध्यक्ष कमलेश चिंधेकर व सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी व साहायक अभियंता गावंडे यांना देत कनेक्शन देण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.

हे पण वाचा

टीम झुंजार