जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.
वृषभ :-
घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. महागड्या वस्तू सांभाळून ठेवा. सावधगिरीने परिस्थिती हाताळा.
मिथुन :-
कुटुंबात मान वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.
कर्क :-
आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.
सिंह :-
दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.
कन्या :-
आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.
तूळ :-
आपले मत सर्वांसमोर मांडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.
वृश्चिक :-
नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल.
धनू :-
आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढीस लागेल.
मकर :-
भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा. कमिशनचा लाभ मिळेल.
कुंभ :-
मनातील निराशा झटकून टाका. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.
मीन :-
नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. क्षुल्लक वादापासून दूर रहा. दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल.
हेही वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले