आडगाव ता एरंडोल ग्राम पंचायतीचे. दोन सदस्य अपात्र, अतिक्रमण प्रकरण भोवले

Spread the love

झुंजार । प्रतिनिधि:-आडगाव ता एरडोल येथील ग्राम पंचायत सदस्य श्री संतोष जगन्नाथ महाजन, सौ छायाबाई सुभाष पाटील. यांनी मालकी हक्काचे जागे पेक्षा सार्वजनिक जागेवर बेकायदा अतिक्रमण करून वाढीव घरांचे बांधकाम केलेले आहे. म्हणून त्यांना पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे अशी तक्रार श्री रवींद्र हरी साबळे व श्री रविंद्र आसाराम महाजन यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती. त्यावर चौकशी होऊन अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दोनही सदस्याना पदावरुन अपात्र ठरविले आहे.

या बाबत नुकताच निकाल दिला आहे .या महत्वपूर्ण निर्णया मुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलेला आहे. या बाबत सर्विस्तर वृत असे की आडगाव ग्राम पंचयतीचे सदस्य श्री संतोष माळी व सौ छाया बाई पाटील यांनी व कुटुंब प्रमुखानी मालकी हक्काचे जागे पेक्षा सार्वजनिक व शासकिय जागेवर बेकायदेशीर पणे अतिक्रमण करून राहते घरांचे बांधकाम केले आहे,अशी तक्रार श्री रवींद्र साबळे व रवींद्र महाजन यांनी जिल्हाधीकारी यांचे कडे केली होती.

त्यावर सुनावणी होऊन ग्राम पंचायत मालकीच्या सार्वजनिक गटारीवर ओटा,पडदया,पायऱ्या. चे वाढीव घराचे बाधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे दोनही सदस्य यांना ग्रा प. सदस्य पदावरून अपात्र ठरविले आहे.या महत्वपूर्ण निकाला मुळे सदस्यांन म्हधे एकच खळबळ उडाळी असुन गावातील वाढते अतिक्रमण रोखण्यास मदत होणार आहे. तक्रारदार श्री रविन्द्र हरी साबळे, व श्री रविन्द्र महाजन यांचे तर्फे अँड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या निर्णया कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य लागून होते.

हे पण वाचा

टीम झुंजार