अरे बापरे ‌‌.. पाहता पाहता उभा असलेला ट्रक दरीत पलटला, धक्कादायक व्हिडिओ

Spread the love

बुलडणा : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मलकापुर मार्गावरील राजूर घाटात एक ट्रक पलटी झाला होता आणि काही क्षणातच तो सुरक्षा भिंत तोडून दरीत कोसळला. परंतु सुदैवाने झाडामुळे काही अंतरावर अडकून पडला. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक जवळपास दीड तास विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरहुन बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचा राजूर घाटातील एका वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला होता. त्याला क्रेनच्या साह्याने उभे करण्यात आले होते आणि नंतर हा ट्रक घाटाची सुरक्षा भिंत तोडून दरीत पलटी झाला.

पहा व्हिडिओ :

सुदैवाने हा ट्रक झाडात अडकलेला असल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. दरम्यान घटना स्थळावरील एका नागरिकाने ट्रक पलटी होतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार