पुणे : – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. आपण अनेकवेळा रेल्वे गाड्यांमध्ये जागेवरून होणारे भांडणे पाहिलेत असतील. अशाच प्रकारे सिंहगड एक्सप्रेसच्या बोगीत चाकरमानी यांच्यात जागेवरुन तुफान हाणामारी बघायला मिळाली. सहास गुण्यागोविंदाने पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणारे चाकरमानी भांडणाच्या मूडमध्ये दिसून आले.
सिंहगड एक्सप्रेस बुधवारी सकाळी चिंचवड स्टेशनवर आली असता काही प्रवाशांमध्ये जागा पकडण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद पुढे इतका वाढला की प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला. या वादानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळ्या बोगीची मागणी होताना दिसत आहे.
पहा व्हिडिओ :
या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्येच महिला प्रवाशांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. ट्रान्स हार्बर लोकल मार्गावरील ठाणे ते पनवेल लोकलमध्ये हा प्रकार घडला. बसण्याच्या जागेवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून महिला आपापसात भिडल्या. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ही जोरदार मारामारी झाली. हा प्रकार ट्रेनच्या डब्यातील इतर महिलांनी कॅमेरात कैद केला.
हे वाचलंत का ?
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.