कळंब (जि.उस्मानाबाद) : – कळंब आगारातील सोशल मिडियावरील ‘रील’स्टार महिला वाहक मंगल गिरी यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, विविध स्तरातून दबाव वाढल्यानंतर आज आगार व्यवस्थापकांनी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.
कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मिडीयावर सक्रीय आहेत. विविध रील्सच्या माध्यमातून त्या लोकप्रिय झाल्या होत्या. मात्र, त्यांचे वर्तन महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत १ ऑक्टोबर रोजी गिरी यांना निलंबित करण्यात आले होते. सोबतच वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांनाही निलंबित करण्यात आले. त्यानंतर या निर्णयावरून महामंडळाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. अनेक राजकीय नेत्यांनी याची दखल घेत गिरी यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती.
दरम्यान, विविध स्तरातून होत असलेली टीका आणि वाढत्या दबावामुळे महामंडळाने आज निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार केला. कळंबच्या आगार व्यवस्थापकांनी दोनच ओळींचे पत्र काढून निलंबन आदेश मागे घेत असल्याचे गिरी व कुंभार यांना कळविले आहे.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले