जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.
वृषभ :-
लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल.
मिथुन :-
विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. अपचनाचा त्रास संभवतो.
कर्क :-
दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.
सिंह :-
मनाला न पटणार्या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.
कन्या :-
स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.
तूळ :-
अघळपघळ बोलू नका. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. जन संपर्कातून लाभ होईल.
वृश्चिक :-
फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.
धनू :-
समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.
मकर :-
चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
कुंभ :-
उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.
मीन :-
बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






