बुलडाणा : – सध्या महाराष्ट्रात सर्वत्र सोयाबीन मळणी चे काम चालू आहे अश्यातच खामगाव तालुक्यात सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख शेत शिवारातील दिलीप भास्करराव देशमुख यांच्या शेतात. शुक्रवारी सायंकाळी सोयाबीन मळणीचे काम सुरू होते. यासाठी रामेश्वर प्रल्हाद थोरात यांच्या मालकीच्या एमएच २८ एजे २१२५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मळणी यंत्राची जोडणी करण्यात आली. दरम्यान, या यंत्रात सोयाबीन लोटत असताना ज्ञानेश्वर दामोदर अढाव (२५) या युवकाचा हात ओढल्या गेल्याने त्याचे संपूर्ण शरीर मळणी यंत्रात अडकले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठल बाळकृष्ण अढाव (२७) यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






