कळंब गावचे सुपुत्र चि. राजेंद्र कांबळे यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.


कळंब :- ( ता. इंदापूर )
वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंबमधिल माजी विद्यार्थी चि.आदेश राजेंद्र कांबळे याने एच एस सी उत्तीर्ण होऊन प्रतिकुल परिस्थितीवर मात करून जिद्दीच्या जोरावर वयाच्या वीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तो भारतीय सैन्य दलामध्ये त्याची निवड झाल्याबद्दल कळंब परिसरात सर्वत्र त्याच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या चि.आदेशने शिक्षण घेत असताना फळे विक्रीचा व्यवसाय करून उत्तुंग ध्येय मनाशी बाळगून भरतीचा दैनंदिन सरावही चालू ठेवून पहिल्याच प्रयत्नात तो भारतीय सैन्य दलामध्ये निवडला गेला.


चि.आदेश कांबळे हा इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नामांकित असलेल्या वालचंद विद्यालय व ज्यूनिअर काॅलेज कळंब येथील विद्यार्थी असल्याने त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा सर्वप्रथम सत्कार करणे हे आमचे आद्यकर्तव्य असल्याचे मत विद्यालयाचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांनी त्याच्या सत्काराप्रसंगी व्यक्त करून चि.आदेश कांबळे याने वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात भारतीय सैन्य दलामध्ये भरती होऊन देशसेवेमध्ये याअगोदर विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असल्याने तीच परंपरा चि.आदेशने पुढे चालू ठेवली याचा माझ्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार अध्यक्ष श्री रामचंद्र कदम यांनी व्यक्त केले.या सत्काराच्या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री बी.के.सर्वगोड सर, पर्यवेक्षक श्री राजेंद्र माळवदकर सर,शिक्षक प्रतिनिधी श्री हरिश्चंद्र गलांडे सर,श्री सुरेश अर्जून सर,श्री राजेंद्र बोंद्रे सर, श्री पोपट पाटोळे सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार