अमळनेर / जळगांव दि . १३
अमळनेर : – चिमणपुरी पिंपळे केंद्राची शिक्षणपरिषद जि प प्राथ शाळा शिरुड ता अमळनेर येथे दि १३ आँक्टोबर रोजी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रविंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली . यावेळी प्रमुख पाहुणे तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सो . श्री व्ही एच पाटील साहेब, मारवड – अंमळनेर बीट च्या शिक्षणविस्तार अधिकारी श्रीम कल्पना वाडीले, व ग्रेडेड मुख्याध्यापिका सौ रत्ना भदाणे, माध्य शिरुड चे मुख्याध्यापक श्री राजेंद्र शिंदे व उषा भदाणे व भारती शिंदे या उपस्थित होत्या .यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले . यावेळी ईशस्तवन व स्वागतगीत व देशभक्ती पर गीत मानवी पाटील, रागिणी शिंपी, मिताली पाटील, प्रिती माळी, कावेरी पाटील, प्रज्वल पाटील, देवेंद्र पाटील यांनी सादर केले . तसेच उपस्थित मान्यवर व केंद्रातील अंतर्गत मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी विशेष सत्कार जि . प जळगांव आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबददल शिरुड शाळेतील शिक्षिका श्रीम दर्शना चौधरी व समाज भूषण पुरस्कार मिळाल्या बददल गजानन चौधरी व निलम चौधरी, अशोक पाटील, भारती शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला प्रास्ताविक शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका सौ रत्ना भदाणे यांनी केले . यावेळी अध्यापन दिग्दर्शनात श्री अशोक पाटील यांनी विद्यार्थ्याच्या कडून इ ३ री च्याActivity सादर केल्या . तसेच श्री व्ही . एच .पाटील साहेब यांनी निपुण चाचणी बद्दल व गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणते उपकम राबविले पाहीजे याचे सखोल मार्गदर्शन केले,
शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी व गुणवत्ता साठी सर्व शाळांनी सेमी शाळा पँटर्न राबविण्याचे आव्हान केले . केंद्राचे व केंद्रप्रमुख श्री आर . एल साळुंखे यांनी शिक्षक पर्व व प्रश्नपेढी बद्दल शिक्षकांना मार्गदर्शन केले . व शासकिय कामकाज करून राष्ट्रगीताने कार्यकमाची सांगता करण्यात आली . या शिक्षणपरिषद यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्री छोटूलाल सुर्यवंशी, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, विनोद पाटील, संगिता पाटील, दर्शना चौधरी यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचलन व आभार श्री विनोद पाटील यांनी मानले .
हे वाचलंत का ?
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.