धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव – इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे हे विराजमान होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक ए एस पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती – मिसाईल मॅन – भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा सामूहिक आनंद घेतला. यावेळी जेष्ठ शिक्षक किरणं चव्हाण यांनी प्रस्तावनेत वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले व डॉ कलाम यांचा जीवनपट, कार्य व पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते असे प्रतिपादन केले. शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे यांनी मुलांनी जास्तीत जास्त ग्रंथालयातून अवांतर पुस्तकांचे वाचन करावे हीच डॉ.कलाम साहेबांना खरी आदरांजली ठरेल. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक ए एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिलेे
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण चव्हाण तर आभार बाबाजी मासूळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.
या सुंदर अश्या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सी के पाटील,व सचिव सुरेखा पाटील यांनी केले आहे
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






