दुपारची वेळ, सिद्धी घरात झोपली! काहीतरी चावल्यासारखं झालं म्हणून उठली, पाहते तर काय ?,एकदा, दोनदा नव्हे तर…

Spread the love

  • एकदा दोनदा नव्हे तर एकाच वेळी 3 वेळा सर्पदंश! चिपळूणमधील थरारक घटना

  • उंदराचा पाठलाग करत साप घरात, झोपलेल्या मुलीला दंश; रुग्णालयात नेईपर्यंत घात झाला…

रत्नागिरी : – सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेली घटना मन हेलावणारी आहे. यात गाढ झोपेत असलेल्या मुलीला याची कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काय घडणार आहे. ही घटना रत्नागिरी चिपळूणमधील घोणसरे येथून समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात एका गावात सर्पदंश झाल्याने तरुणीने जीव गमावलाय. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. दुपारच्या सुमारास सर्पदंश झाल्यानंतर या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घडली. धक्कादायक बाब म्हणजे, एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा या तरुणीने सापाने दंश केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

चिपळून तालुक्यातील घोणसरे गावातील तरुणावर काळानं घाला घातला. सिद्धी रमेश चव्हाण असं सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. तरुण मुलीच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्काच बसलाय.

गुरुवारी दुपारी 3 वाजता सिद्धी घरात झोपली होती. त्यावेळी तिला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून ती उठली. तिने पाहिलं तर चक्क सर्पदंश झाल्याचं तिच्या निदर्शनास आलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. विष बघता बघता शरीरात विष भिनलं. तिच्या शरीराचा रंग काळा पडू लागल्यानंतिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.

उंदराच्या मागावर असताना साप घरात शिरला असावा, असा अंदाज वतर्वला जातोय. सापाने तीन वेळा सिद्धीला दंश केला. दुपारी गाढ झोपेत असलेल्या सिद्धीची झोप दुर्दैवानं अखेरची झोप ठरली. गुरुवारीच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान सिद्धी चव्हाण या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेनं घाणसरे गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार