VIDEO : “वाचवा रे!…बसचालक त्रास देतोय, मदत करा, उतरू देत नाही,बस ड्रायव्हर मला किडनॅप” असं म्हणत प्रवाशाने ठोकली बोंब.

Spread the love

पुणे :- सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे . पिंपरी – सोशल मीडियावर शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बसमधील एक प्रवासी तरुण ‘मला वाचवा, मला वाचवा’ असे ओरडत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. ‘ड्रायव्हर मला किडनॅप करत आहे. तो मला बसमधून उतरू देत नाही.’ ‘मला माझ्या ऑफिससमोर सोडा’ अशा प्रकारे तो चालकाच्या केबिनच्या बाजूला उभा राहून जोर-जोरात आरडाओरड करत आहे. हा व्हिडिओ चिंचवड मार्गे धावणाऱ्या पीएमपीएमएल बसमधील आहे.

पुणे तिथं काय उणे अस नेहमीच म्हटलं जातं त्याचा प्रत्येय चिंचवडमध्ये आला आहे. पीएमपीएल बस चालक आणि प्रवाशाच्या भांडणाचा भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. प्रवाशाने अरेरावी केल्याने बस चालकाने बसचे दार लॉक केले त्यामुळे प्रवाशाला उतरता आले नाही. म्हणून प्रवाशाने चक्क बोंब मारत बस चालक त्रास देत असल्याच नागरिकांना सांगत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

पहि व्हिडिओ :

पीएमपीएल बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने खाली उतरण्यावरून बस चालकाशी अरेरावी केली. बस थांबा निघून गेल्यानंतर प्रवाशाने बस थांबवण्यासाठी सांगितली. एवढंच नाही तर त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप चालकाने केला आहे. बस थांबली पण बस चालकाने दरवाजा लॉक केला. यामुळं प्रवाशाला खाली उतरता येत नव्हतं. अखेर प्रवाशाने मला चालक त्रास देतोय मला वाचवा, मदत करा असं म्हणून चालकाच्या नावाने बोंब मारायला सुरुवात केली. रस्त्यावरून जाणारे नागरिक, वाहनचालक हे पाहून थांबले. दोघांचे हे भन्नाट भांडण सोडवण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला. हा व्हिडीओ बसमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार