सोयगाव तालुका प्रतिनिधी (आप्पा वाघ)
घोसला ता. (सोयगाव) : महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे घोसला सह (ता. सोयगाव) परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक ते-दिड महिन्या पासून निम्मे गाव अंधारात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे.
विशेष करून दलित्वस्तित्त विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे..
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे.
तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन सणासदीच्या काळात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. – गणेश माळी सरपंच, चांगले अधिकारी देण्याची मागणी करत आहे कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे घोसल गावं समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रभारी अधिकाऱ्यावर कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
चौकट
सरपंच मा. सरपंच सदस्य यांनी दिपावली निमित्ताने गट विकास अधिकारी व तहीलदार यांचेकडे
संपूर्ण गावासाठी मेणबत्या,पणत्या पंधरा वित्त आयोग मधूनखरिदी करण्यासाठी परवानगी द्यावी असे सुचवले आहे…
सरपंच गणेश माळी