Shocking Video: रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असतात. ही घटनाही अशाच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता ती खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कार टोल बूथकडे सुसाट वेगाने येताना दिसत आहे.
नवी दिल्ली :- रस्त्यावरुन जाताना तुम्ही जेवढे सावध राहाल तेवढं कमी असतं कारण काही हट्टी लोक ना पोलीस किंवा सरकारने बनवलेल्या नियम पाळतात. ना त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा असते ना दुसऱ्यांच्या जीवाची. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हाच अनुभव येईल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
हा अपघात पाहून अंगावर काटा येईल
रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असतात. ही घटनाही अशाच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता ती खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कार टोल बूथकडे सुसाट वेगाने येताना दिसत आहे. पण, त्यानंतर काय झालं, पाहा या भयानक व्हिडिओत
ड्रायव्हर काच फोडून बाहेर उडाला
या व्हिडीओमध्ये बघायला मिळतंय की टोल बुथच्या डिव्हायडरला भरधाव वेगात कार कशी धडकते आणि कारचा स्फोट होतो. ही धडक एवढी जोरदार होती की, वाहनाची काच फुटून चालक उडून खाली पडतो. यावरुन या अपघाताचे गांभीर्य लक्षात येते. अपगातानंतर कारला आग लागल्याचे व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे.
व्हिडिओ पाहून लोक हैराण
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ हजारो लोकांनी सोशल मीडियावर पाहिलाय आणि लाईक केला आहे. इतकंच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये अनेकजण वाहतूक नियम पाळण्याबाबत बोलू लागले. रस्त्यावरील अशा प्रकारचा निष्काळजीपणा केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांसाठीही धोकायदायक ठरु शकतो.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






