झुंजार । प्रतिनिधी एरंडोल :- वाळू उपशावर बंदी असतांना देखील उत्राण (ता.एरंडोल) परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून महसूल अधिका-यांच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे संताप झालेल्या उत्राण अहिरहद्दच्या सरपंच शारदा भागवत पाटील,त्यांचे पती भागवत पाटील आणि कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष भिकन कोळी यांनी आज साडेअकरा वाजेच्या सुमारास तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी उपस्थित असलेले माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांचेसह पदाधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांनी वेळीच प्रसंगावधान राखून सरपंच शारदा पाटील यांच्या हातातील आगपेटी हिसाकावाल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यावेळी माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे कारवाई करून वाळूची होणारी तस्करी रोखून वाळू माफियांवर कारवाई करावी अन्यथा सोमवार पासून तहसीलदार कार्यालयासमोर पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासमवेत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला.प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी लेखी पत्र दिल्यानंतर संताप झालेले ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी तहसीलदार कार्यालय परिसरातून निघाले.यावेळी माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरून गिरणानदी परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा केली.अवैध वाळू वाहतुकीच्याविरोधात सरपंचास परिवारासह आत्मदहनासारखा निर्णय घ्यावा लागतो हे दुर्दैव असल्याचे सांगितले.

यापूर्वी देखील अवैध वाळू वाहतुकीविरोधात आपण स्वत: उपोषण केले असून अनेकवेळा वाळू वाहतूक करणारी वाहने पकडून पोलीस स्थानकात जमा केले असून देखील महासूल प्रशासन वाळूमाफियांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.महसूल अधिकारी आणि पोलिसांकडून अवैध वाळू वाहतुकीविरोधात लढा उभारणा-या पदाधिका-यांना धमक्या दिल्या जातात आणि वाळू माफियांना संरक्श दिले जात असल्याचा आरोप केला.यावेळी सरपंच शारदा पाटील,त्यांचेपती भागवत पाटील,भिकन कोळी यांचेसह उपस्थित ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतापात भावना व्यक्त केल्या महसूल कर्मचारी हप्ते घेवून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वाळूमाफियांना संरक्षण देत असल्याचा आरोप भागवत पाटील यांनी केला.

गिरणा नदीच्या पात्रातून होणा-या वाळूच्या चोरीबाबत अनेकवेळा ताक्रारीकरू देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले.अवैध वाळू वाहतुकीविरोधात तक्रार केल्या कारणावरून २६ ऑगस्ट रोजी वाळू माफिया आणि त्यांच्या हस्तकांनी भागवत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.त्यानंतर वाळू तस्करांकडून त्यांना कायम जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर देखील दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संताप झालेल्या सरपंच शारदा पाटील,भागवत पाटील व त्यांच्या परिवाराने आत्मदहनासारखे टोकाचे पाउल उचलले.

दरम्यान सकाळी साडे अकरा वाजता माजीमंत्री डॉ.सतीश पाटील व विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सरपंच शारदा पाटील,भागवत पाटील,भिकन कोळी तहसीलदार कार्यालयाकडे येत असतांना अचानक शारदा पाटील,भिकन पाटील आणि भागवत पाटील यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकाचा धावपळ उडाली.माजीमंत्री डॉ.सतीश पाटील,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,डॉ.राजेंद्र देसले,संदीप वाघ,आनंदा धनगर,हारुण देशमुख,दत्तू पाटील यांचेसह उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांनी वेळीच प्रसंगावधान पाहून त्यांच्या हातातील आगपेटी हिसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पहा व्हिडीओ
पदाधिकारी आणि पोलिसांनी सावधानता बाळगली नसती तर मोठी दुर्घटना तहसीलदार कार्यालयात घडली असती.भागवत पाटील आणि त्यांच्या परिवारातील सदस्य आज आत्मदहन करणार असल्यामुळे वाळू माफिया आणि त्यांचे दलाल सकाळी साडेदहा पासूनच तहसीलदार कार्यालय परिसरात फिरत होते.याठिकाणी होणा-या घटनांची माहिती वाळूमाफियांचे दलाल मोबाईलवरून देत होते.सदराची माहिती कोणाला देण्यात येत होती याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु होती.गिरणा नदीच्या पात्रातून दररोज सुमारे शंभर वाहनातून वाळूची वाहतूक केली जात असताना देखील महसूल प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत होते.जेसीबीच्या माध्यमातून पात्रातून वाळूचा उपसा केला जात होता.रात्री नऊ वाजेपासून पहाते सहा वाजेपर्यंत गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची खुलेआमपणे चोरी केली जात होती.वाळूमाफिया जास्त दराने वाळूची विक्री करून ग्राहकांची लुट करीतआहेत.

वाळूमाफियांकडून विशिष्ट कोडच्या माध्यमातून वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.वाळूची वाहतूक करणारे वाहने भरधाव वेगाने जात असल्यामुळे मोती दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.वाळूमाफियांनी ठिकठीकाणी वाळूचा साठा केला असून तो जप्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी भातखेड्याचे सरपंच मनोहर पाटील,हनुमंतखेड्याचे सरपंच विनोद पाटील,विकी पाटील,शिवाजी पाटील,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,चंद्रकांत वाघ,आनंदा धनगर,कैलास कोळी,भास्कर मोरे,गौरव पाटील,छोटू चौधरी,सागर बियाणी,रजनी धनगर,मंगलाबाई कोळी,दत्तू चौधरी यांचेसह परिसरातील ग्रामस्थ,विविध आजाकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट-
माजीमंत्री डॉ.सतीश पाटील भागवत पाटील,शारदा पाटील आणि पदाधिका-यांसह चर्चा करीत तहसीलदार कार्यालय परिसरात येत होते.सर्वजण चर्चा करीत असतांना सरपंच भागवत पाटील.दत्तात्रय पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतल्यामुळे एकच गोंधळ उडाला.पोलीस कर्मचारी,महिला पोलीस आणि पदाधिकारी यांनी शारदा पाटील आणि भागवत पाटील याना समजावण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी भिकन कोळी यांनी देखील अंगावर पेट्रोल ओतल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.शारदा पाटील यांच्या हातात आगपेटी देखील होती आणि त्यांनी पेटवण्याचा प्रयतनदेखील केला,मात्र उपस्थितांनी त्यांच्या हातातील पेटी हिसाकावाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.ग्रामस्थांनी केलेल्या मागणीमुळे माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही लावण्याची घोषणा करून लागणा-या खर्चाची रक्कम पदाधिका-यांकडे सुपूर्द केली.यावेळी माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांचे भावनिक आणि आक्रमक असे दोन रूपे ग्रामस्थांना पहायला मिळाली.

गिरणा नदीतील वाळू ठेक्याच्या लिलाव हा गेल्या दोन वर्षापासून झालेला नाही.वाळू ठेक्याच्या लिलाव न झाल्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारे गिरणा नदीत कोपलिन (जे. सी. बी.) उतरवून त्याच्या साह्याने ट्रॅक्टर व डंपर मध्ये अवैध वाळू वाहतूक करतात गिरणा नदीतून दररोज 15 डंपर व 40 ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करतात सरपंच शारदा पाटील व भागवत पाटील यांनी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार व प्रांत यांना मे महिन्यात व जुलै महिन्यात असे दोन निवेदन दिले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांनी त्यांच्यावर 26 ऑगस्ट रोजी प्राणघातक हल्ला केला होता. तहसील कार्यालयामार्फत 5 मे 2022 रोजी अवैध वाळू वाहतुकीसाठी पथक नेमण्यात आले आहे.
या पथकाने कोणत्याही ट्रॅक्टर किंवा डंपर वर आतापर्यंत कारवाई केलेली नाही असे नाम मात्र हे पथक आहे. तहसील कार्यालयामार्फत सहा महिन्यांमध्ये फक्त दोन ट्रॅक्टरवरच कार्यवाही झाली आहे. ते पण त्यांनी अवैध वाळू वाहतूक चा हप्ता न दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांनी पण हप्ता दिला असता तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली नसती असा आरोप भागवत पाटील यांनी केला आहे. अवैध वाळू वाहतूक तिच्याविरोधात तहसील कार्यालयासमोर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार असताना डॉ. सतीश पाटील, हनुमंत खेडे सिम माजी सरपंच किशोर पाटील, कासोदा येथील सामाजिक कार्यकर्ते भटू चौधरी हे वेगवेगळे उपोषणास बसले होते. उपोषण सोडण्यासाठी अवैध वाळू करणाऱ्या वाहनांवर थातूरमातूर कारवाई होते. व काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थे अशी राहते.