जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ :-
कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्या येऊ शकतात.
मिथुन :-
भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल.
कर्क :-
जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका.
सिंह :-
प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. मानसिक शांतता राखावी.
कन्या :-
प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी.
तूळ :-
लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल. मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील.
वृश्चिक :-
गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग.
धनू :-
पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.
मकर :-
कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका.
कुंभ :-
व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. वाहनाचे काम निघू शकते.
मीन :-
व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल.
हेही वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले