VIDEO : मोठी बातमी : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, 6  जणांचा दुर्दैवी मृत्यू.

Spread the love

रूद्रप्रयागः – केदारनाथमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गौरीकुंड येथे हा अपघात घडला असून आर्यन या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.  केदारनाथ येथे हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा अंदाज बांधण्यात येत आहे.

गुप्तकाशीहून जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देणार असताना ही घटना घडली आहे.

पहा व्हिडिओ :

टीम झुंजार