आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र अलिकडे काही उटण्यांमध्ये केमिकल्सही वापरले जातात. त्यामुळे आम्ही घरच्या घरी उटणे कसे तयार करावे हे तुम्हाला सांगणार आहोत.
उटणे हा अगरू, चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेला एक लेप आहे. हा अंगासा लावल्याने केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो. जुन्या काळात सहजगत्या उपलब्ध असणारे कस्तुरी आणि केशर हे पदार्थ सध्या सहज उपलब्ध नाहीत. उपलब्ध झाल्यास ते बरेच महाग आहेत.
त्यास पर्याय म्हणून आजकाल कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या सावलीत वाळवलेल्या पाकळ्यांची पावडर, वाळ्याच्या मुळ्यांची पावडर, हळद पावडर, अर्जुन वृक्षाच्या वाळून गळून पडलेल्या सालीची पावडर इत्यादी सुगंधी व औषधी वनस्पती वापरून उटणे तयार करतात. यास दुधात घट्ट भिजवून त्यात थोडे तिळाचे तेल टाकून मग अंगाला लावतात. हा लेप मग वाळण्यापूर्वी रगडून काढतात. चेहर्यास लावलेला लेप रगडून न काढता हलके हाताने काढतात.
पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात. ही उटणी पाण्यात भिजवून नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापूर्वी अंगाला लावतात.
उटणं लावून आंघोळ करण्याचे फायदे :

त्वचा कोरडी पडत नाही
उटणं लावून आंघोळ केल्यानं त्वचा कोरडी पडत नाही. आंबेहळद त्वचा मऊ ठेवण्यासाठी मदत करते.
त्वचा उजळते
उडण्याने त्वचा उजळते कारण त्यात मसूरची डाळ असते. मसूरची डाळ ही त्वचेसाठी किंवा त्वचा उजळ ठेवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक क्रिममध्ये मसूरच्या दाळीचा वापर करत असतात.
अंगावरील केस दूर होतात
उटणं लावून आंघोळ केल्यानं अंगावरील केस निघतात. कारण आपण उटणं अंगाला लावल्यावर घासून काढतो. त्या घासण्यामुळे अंगावरील मळ आणि केसही निघतात.
घरी उटणं करण्याची सोपी पद्धत :
मसूर डाळ पीठ – 110 ग्रॅमआवळकाठी – 10 ग्रॅमसरीवा – 10 ग्रॅमवाळा – 10 ग्रॅमनागर मोथा – 10 ग्रॅमजेष्टमध – 10 ग्रॅमसुगंधी कचोरा – 10 ग्रॅमआंबेहळद – 2 ग्रॅमतुलसी पावडर – 10 ग्रॅममंजीस्ट – 10 ग्रॅमकापूर – 2 ग्रॅम
या पदार्थांचं बारीक मिश्रण तयार करुन तुम्ही घरीच उटणे तयार करु शकता.
हे वाचलंत का ?
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.