निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
खिर्डी ता. रावेर :- येथे अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व हरी लक्ष्मण पाटील जुनियर कॉलेज च्या प्रांगणात खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती गीतांचा” एक शाम देश के नाम” हा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमात कलावंत ,राजकीय ,सामाजिक ,कृषि ,यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 14 मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे होते.प्रास्ताविक गुणवंत पाटील यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत चंद्रकांत कोळी, प्रवीण धुंदले, यासह पदाधिकाऱ्यांनी केले सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते सरस्वती माता प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील रावेर, (आदर्श यशस्वी उद्योजक) ,माजी जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन तांदलवाडी (आदर्श समाज भूषण) ,श्री. महंत गोविंदराव शास्त्री मराठे फैजपूर (आदर्श प्राचार्य ),भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन तांदलवाडी(आदर्श युवा नेता),रावेर पंचायत समिती माजी सभापती सौ कविता हरलाल कोळी (आदर्श महिला पंचायत समिती सभापती), पत्रकार व संगीत कलावंत राजीव बोरसे निंभोरा( उत्कृष्ट संगीत कलारत्न), माजी पंचायत समिति सदस्य दिपक पाटील वाघाडी ( आदर्श समाजसेवक),तसेच शशांक पाटील तांदलवाडी ( कार्यक्षम कृषी सेवक),संतोष महाजन बलवाडी ( सामाजिक सलोखा), दिनेश उर्फ छोटू पाटील रेंभोटा (आदर्श शेती मित्र), विजय मधुकर पाटील खिर्डी ( आदर्श शेतकरी ),उत्कर्ष किरण नेमाडे खिर्डी ( आदर्श युवा संगीतकार) , शेख इमरान शेख कमर खिर्डी ( आदर्श सामाजिक सहयोग) ,निंभोरा पोलीस स्टेशन सपोनी गणेश धुमाळ ( आदर्श कर्तव्यदक्ष अधिकारी ) असे सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव आमदार चंद्रकांतभाऊ पाटील,प्रमुख अतिथी परमपूज्य आचार्य मानेकर बाबा शास्त्री सावदा, परमपूज्य स्वरूपानंदजी महाराज डोंगरदे , आचार्य महंत नरेंद्र महाराज खिर्डी यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सैनिक जवान भरत चिमणकर, अक्षय कोळी , युवराज सावंत यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कांतीलाल गाढे यांनी देशभक्तिपर कविता सादर केली तर देशभक्तीपर गीत चार वर्षीय बालक आयुष प्रदीप पाटील तसेच प्रवीण धुंदले ,इद्रीस शेख , यांनी देशभक्ती गीत गाऊन एक शाम देश के नाम या देशभक्ती गीतांचा कार्यक्रमास सुरवात करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, माजी जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन ,उद्योजक श्रीराम पाटील यांनी तत्पर फाउंडेशनने चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचा गौरव केला.
व्यासपीठावर प्रल्हाद बोंडे , दुर्गादास पाटील ,राजु सवर्णे,खिर्डी सरपंच मधुकर ठाकुर, खिर्डी पोलिस पाटिल प्रदीप पाटिल, सरपंच सचिन महाले ,पत्रकार दीपक नगरे सुनील कोंडे यासह आदि मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप महाराज पंजाबी,भीमराव कोचुरे , संकेत पाटील ,अंकित पाटील, सतीश फेगडे, रितेश चौधरी यासह तप्तर फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नगीनदास इंगळे रावेर यांनी केले तर आभार प्रदर्शन कांतिलाल गाढ़े, व प्रदीप महाराज पंजाबी यांनी केले
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.