रावेर : – महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच रावेर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळच असलेल्या पाल येथे निर्जन स्थळी घेऊन गेले व ४ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान अल्पवयीन मुलगी गरोदर देखील राहिली, अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार आळीपाळीने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
निर्जनस्थळी नेवून केला आळी पाळीने सामुहिक बलात्कार
पाल येथील निर्जन स्थळी नेवून यांनी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी रवी छपरीबंद,आनंद बाविस्कर,सुजल छपरीबंद , गौरव जावे सर्व राहणार रावेर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून या चारही आरोपीनी पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचे म्हटले आहे. तसे न केल्यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच शिवीगाळ केली व वारंवारं बलात्कार केलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.रवी छपरीबंद याने पीडित मुलीला स्वतःच्या घरी डांबुन ठेवुन फिर्यादी पिडीत हिला नमुद आरोपी क्र.१ ते ४ यांनी तिचेवर वारंवार बलात्कार केला.सदर घटना २ जानेवारी २०२२ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधी घडली आहे.
फिर्यादीने स्वत:ची सुटका केल्यावर देखिल नमुद आरोपी क्र १ ते ४ यांनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर फिर्यादी पिडीतेवर अत्याचार केला. सदर झालेल्या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळया घेवून गर्भपात केला. आलेली आपत्ती टाळण्यासाठी फियांदी पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त इसमा सोबत लावुन दिले आहे. नमुद हकिकत वरुन भाग-५ पोलीस स्टेशन,गुरन ३६७/२०२२ भा. द वी कलम ३७६ ड, ३७६ (२) (n), ३६३, ३६६ अ ३४२,३२३, ५०४, ५०६, ३४ पोस्को कलम ४,६,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनिरी विशाल. नागो सोनवणे करित आहे.
हे वाचलंत का ?
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.