संकल्पना :- पोलिस ठाणे धरणगाव जिल्हा जळगाव
धरणगाव :- पोलीस हद्दीतील धरणगाव बस स्टाॕप,छत्रपती शिवाजी महाराज चौक,इंदिरा कन्या शाळा, शहरात विविध ठिकाणी व पाळधी येथे ही पथनाट्य सादर…
सादरकर्ते :- ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित,यांच्या मुक अभियानातून पोलीस ठाणे धरणगाव हद्दीत आपल्या मुक अभिनयातून विविध गाण्यांतून जनतेस सावधान राहण्याचे आव्हान करण्यात आले,कोरोना महामारी नंतर सर्वात मोठा सण दिवाळी हा साजरा केला जाणार आहे, यासाठी माननीय पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रावले साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल खताळ यांनी एक संकल्पना आखली. त्यात नागरिकांची जनजागृती केली पाहिजे विविध प्रयोगांतून नागरिकांना कसे सतर्क राहण्याचे आव्हान करता येईल,त्यासाठी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध जूनियर चार्ली समाजसेवक सुमित पंडित यांच्याशी संपर्क करून आपण जनतेला धरणगाव शहर हद्दीत जनजागृती चा जो कार्यक्रम घेतला त्यात धरणगाव शहरात देखील आपल्या मूक अभिनयातून एक वेगळा संदेश देऊया ! असा निर्धार केला आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना चोरी, मारामारी,चैन स्नँकींग , पाॅकेट मारी, दुचाकी, चार चाकी चोरी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली.

त्यात त्यांची साथ लाभली ती माणुसकी रुग्णसेवा समूहाची दिनांक १९/१०/२०२२ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात धरणगाव पोलिस स्टेशन पासून करण्यात आली, त्यात बस स्टाप,छत्रपती शिवाजी महाराज चौक,इंदिरा कन्या शाळा, पाळधी गावातील नागरिकांना समोर जन जागृती करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सावधान,दिवाळीच्या सणाला गावी जात आहात तर घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी राबवलेली आपला शेजारी,खरा पहारेकरी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे सर ,अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे सर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रावले सर, यांच्या मार्गदर्नाखाली हा कार्यक्रम घेन्यात आला.

कार्यक्रमासाठी विषेश सहकार्य लाभले ते पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब,पोलीस उप निरिक्षक संतोष पवार,अमोल गुंजाळ,पो.हे.काँ.संजय सुर्यवंशी,पो.हे.काँ.ईश्वर शींदे,वैभव बाविस्कर,गजेद्र पाटील,पो.ना.मीलींद सोनार,विजय धनगर,
विनोद संदानशीव ,अरुण सातपुते,महिला पोलीस कर्मचारी मंगला पवार,हर्षली खैरनार,व नागरीकांनी मोठ्या उत्साहाने जनजागृती अभियानात सहभाग घेतला व शाळेतील विद्यार्थ्यांनी तर धमालच केली व समस्त जागृत नागरिक धरणगाव शहर, या गावी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला हजेरी लावली होती,ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित व माणुसकी समुहाचे समाजसेवक चेतन पाटील, मुख्खध्यापक मनोज ठाकरे,यांनी एकपात्री पथनाट्य सादर केले. वरील सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला.
“आपला शेजारी,खरा’ पहारेकरी या संकल्पनेतुन राहुल खताळ यांनी मागदर्शन केले.
सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अफवा सोशल मीडिया द्वारे पसरविण्यात येत आहे. तरी अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये, कोणत्याही सोशल मीडियातील अथवा फोन वर विश्वास ठेवू नये , धरणगाव शहरात घरफोड्या ,दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जी.पी.आर.एस. सिस्टीम किंवा लोखंडी साखळी,आपल्या गाड्यांना बसवावे व रोकड बॅंकेत ठेवा. पैशांची आवश्यकता असल्यास शक्यतो आँनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्या. आपल्या मोबाइलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करताना स्वतःची खबरदारी स्वतःच घ्या. सोसायटया, बंगले, रो हाउस अशा ठिकाणी वॉचमन सुरक्षारक्षक नेमावे,सी.सी.टीव्ही बसवावेत. आपला शेजारी आपला खरा पहारेकरी असतो अशा शब्दांत त्यांनी प्रत्यक्ष नागरिकात जाऊन आवाहन केले.ज्युनिअर चार्लीने व माणुसकी समुहाने ज्या पथनाट्यातुन जनतेस आव्हान केले की दक्ष नागरीकांनी घ्यावयाची काळजी त्याबद्दल केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे पोलीस प्रशासनातर्फे आभार मानतो.
पोलिस निरिक्षक राहुल खताळ धरणगाव पोलीस स्टेशन.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






