पाणीप्रश्नावर बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्र्याच्या विरोधात ठाकरे गटातर्फे धरणगाव येथे निषेध आंदोलन

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला आणि पाणी पुरवठा संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, बापू महाजन, राहुल रोकडे, विनोद रोकडे, चेतन जाधव, विलास पवार, हे उपस्थित होते

यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी निषेध नोंदवला त्यानी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरांवर हल्ला करणे निदनिय असून गद्दारची पाय खालची वाळू सरकत आहे तसेच मंत्री गुलाबराव पाटील धरणगाव चा पाणीपुरवठा का आकाशातून करू असे बेताल वक्तव्य करत आहे पाणीप्रश्न गांभीर्य यांना कळत नाही खोके घेऊन मस्त झाले आहे

परंतु जनता पाण्याने त्रस्त आहे यांना नागरिकांच्या संवेदना कळत नाही का अस टोल ही त्यानी यावेळी लावला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख तथा मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

हे पण वाचा

टीम झुंजार