जळगाव :- जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (SP Pravin Mundhe) यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार (Jalgaon SP M Rajkumar) यांची वर्णी लागली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आयएएस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक पदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदलीने अद्याप पदस्थापना करण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र आदेश पारित होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






