खळबळजनक : पुण्यात खासगी सोसायटीच्या सेप्टिक चेंबरची स्वच्छता करताना दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

Spread the love

पुणे :-  शहरातील वाघोली परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरातील एका रहिवाशी सोसायाटीच्या सेप्टिक चेंबरची स्वच्छता करताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एक जण बेपत्ता आहे.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोसायटीच्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या 3 कामगारांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शुक्रवारी सकाळी 7 वाजता वाघोली येथे ही घटना घडली आहे.

वाघोली येथे मोझे कॉलेज रस्ता येथे सोलांसिया नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या परिसरातील चेंबरमध्ये काम करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 6 वाजता तीन कामगार आले होते. चेंबर साफ करत असतानाच तिघेजण कामगार चेंबरमध्ये पडले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेला सोसायटीचा सुरक्षा रक्षक त्यांना वाचविण्यासाठी गेला, त्यावेळी सुरक्षा रक्षक चेंबर मध्ये पडला अशी माहिती नागरिकांनी “पीएमआरडीए” अग्निशामक दलाला दिली.

त्यानंतर तेथे तत्काळ दाखल झालेल्या जवानांनी चेंबर मधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले, तर एकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. त्यानंतर काही काळाने तिसऱ्या कामगाराचा मृतदेह सापडला असल्याची माहिती “पीएमआरडीए” अग्निशामक दलाचे विजय महाजन यांनी दिली.

पहा व्हिडिओ :

पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होत आहे.

टीम झुंजार