बाई गृहप्रवेश करताय की फुटबॉल खेळताय? माप ओलांडून घरात येणाऱ्या नवरीचा व्हायरल व्हिडिओ..

Spread the love

Viral Video of Bride During Her Grihapravesh: गृहप्रवेश करताना नवरीने कशा पद्धतीने माप ओलांडले, याचा हा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लग्न होऊन नवरी (bride) जेव्हा पहिल्यांदा तिच्या सासरी येते, तेव्हा घराच्या उंबरठ्याजवळ एक तांदळाने भरलेले माप (glass full of rice) किंवा कलश किंव ग्लास ठेवला जातो. हे तांदळाचे माप अलगद ओलांडायचे आणि मग नवरीने तिच्या सासरच्या घरी प्रवेश (griha pravesh) करायचा, अशी आपल्याकडची प्रथा आहे. अनेक चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्येही हा प्रसंग मोठा छान आणि रंगवून दाखवला जातो. मुळात हा प्रसंग दाखविल्याशिवाय नवरीच्या गृहप्रवेशाचा सीन पुर्णच होत नाही. आता या एका नवरीने (entry of a bride in her new house) उत्साहाच्या भरात असा काही गृहप्रवेश केला की काही विचारूच नका. 

वेशभुषेवरून हे जोडपे दक्षिण भारतीय असल्याचा अंदाज येतोच. दोघेही घराच्या उंबरठ्याजवळ आले आहेत. गुरुजींनी मंत्र म्हटले आणि नवरीला तिच्या पुढे असलेला कलश ओलांडून आत येण्याची सूचना केली. ते पाहून नवरीने तिचा उजवा पाय पुढे केला आणि तांदळाच्या कलशाला असा काही जोरात पाय मारला की तो कलश पार कुठच्या कुठे भिरकवला गेला.

https://www.instagram.com/reel/Ciz-98aJ1Ne/?igshid=YmMyMTA2M2Y=

तिचं हे कृत्य पाहून ती देखील क्षणभर कावरी- बावरी झाली आणि नवरदेव मात्र पुरता गोंधळून गेला. आपल्या बायकोला काय बोलावे, हसावे की रडावे हे त्याला सुचलेच नाही, असे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते.

त्यानंतर मात्र त्या नवरीला तिने जे काही केलं, त्यावर जोरात हसू फुटलं. सोशल मिडियावर या व्हिडिओला अनेक विनोदी कमेंट आल्या असून जवळपास पावणे दोन लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे. 

हे वाचलंत का ?

टीम झुंजार