वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका , समता शिक्षक परिषदेचे शालेय शिक्षण मंत्र्यांना जिल्हाधिकारींमार्फत निवेदन

Spread the love


शोशीत वंचितांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी महाराष्ट्रामध्ये तात्यासाहेब जोतिराव फुले आणि सावित्री माता फुले यांनी जीवाचे रान केले आहे. राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वंचितांच्या शिक्षणासाठी खर्च केले. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लागू झाल्याच्या दहा वर्षाच्या आत बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून मार्गदर्शक तत्वांमधे तरतूद केलेली आहे. 86 आणि 93 वी घटना दुरुस्ती त्या दिशेने खूप महत्त्वाचे पाऊल होते.


2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना सोयीच्या ठिकाणी शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क समजण्यात आला आहे. एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा असावी, असे नमूद केले आहे. असे असतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 21 सप्टेंबर 2022 च्या शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना पाठविलेल्या पत्रात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागितली गेली आहे. तसेच या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 14 हजार पेक्षा अधिक शाळांवर ही कारवाई होणार असल्याचे दिसत आहे. हे सगळं अन्यायकारक व नियमबाह्य असून शासनाने ही कारवाई त्वरित थांबवावी व संबंधित शाळांना दर्जेदार बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या जोडीला प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये, क्रीडा साहित्य, विविध शैक्षणिक साहित्य, व डिजिटल स्कूल बनवण्यासाठी चे प्रयत्न केले जावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमार्फत शालेय शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी मा. राहुल पाटील साहेब यांना संघटनेच्या वतीने आज दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी देण्यात आले. म.राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी यांनी सदर निवेदन मा. शिक्षण मंत्र्यांना पाठवणार असल्याची ग्वाही दिली. व्हायला नको! व्हायला नको! शाळा बंद व्हायला नको! अशा घोषणा शिक्षकांनी परिसरात दिल्या.


याप्रसंगी समताचे उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, राज्य सल्लागार समिती सदस्य धनराज मोतीराय, प्राथमिकचे राज्य संघटक राजेंद्र पारे, पूर्व विभागाच्या अध्यक्षा सौ. मनीषा देशमुख, पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. छाया सोनवणे, उपाध्यक्षा सरिता वासवानी, उपाध्यक्ष गणेश बच्छाव, प्रविण केदार, हेमेंद्र सपकाळे, महानगराध्यक्ष टि.बी.पांढरे, श्रीमती वर्षा अहिरराव, सहसचिव श्रीमती मनीषा ठाकरे, पश्चिम विभाग प्राथमिकचे अध्यक्ष अजय भामरे, माध्यमिकचे सहसचिव सोपान भवरे, सुरेश सोनवणे, संदिप भंगाळे, एरंडोल तालुकाध्यक्ष चिंतामण जाधव, अमळनेर तालुकाध्यक्ष बापूराव ठाकरे/पाटील, सचिव अनंतकुमार सुर्यवंशी, संघटक नरेंद्र अहिरराव, महेश पाटील, विशाल धांडे इत्यादी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार