अरे बापरे…दिवाळीसाठी घरी निघालेल्या मंजुरावर काळाचा घाला; बस अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी 

Spread the love

सध्या देशात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच मध्यप्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. 3 वाहनांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. बस टेम्पो यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

एमपी-यूपी सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वरती हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सोहागी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेतील जखमींना टुंथर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस जबलपूरहून रेवामार्गे प्रयागराजला जात होती.

प्रवासी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी सिकंदराबाद, हैदराबाद येथून लखनौमध्ये त्यांच्या घरी जात होते. दरम्यान, बसमध्ये पहिली प्रवासी बस लखनीसाठी कटनीला पोहोचली. यात अधिक प्रवासी होते. तेथून बस उत्तर प्रदेशातील लखनौला प्रवाशांसह रवाना झाली होती आणि बस रीवाच्या सोहागी डोंगरावर येताच ती नियंत्रणाबाहेर गेली आणि ट्रकला धडकली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार