“आनंदाचा शिधा”चा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा. आ.चिमणरावजी पाटील. एरंडोलला कीट वाटपाचा शुभारंभ.

Spread the love

एरंडोल- राज्य शासनाने गरीब कुटुंबातील अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांसाठी दिवाळीनिमित्त सुरु केलेला “आनंदाचा शिधा” हा उपक्रम गरिबांची दिवाळी गोड करणारा असून रेशन दुकानदारांनी पात्र असलेल्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत कीट पोहोचवावे असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.”आनंदाचा शिधा” कीट वाटपाचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत कीट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी गोरगरीब नागरिकांना देखील दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात “आनंदाचा शिधा” हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले.रवा,चणाडाळ,साखर आणि तेल या वस्तू केवळ रुपयात मिळणार आमुले गरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.कीट वाटपात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी अशी सुचना त्यांनी केली.

गोरगरीब नागरिकांच्या चेह-यावर दिसणारे हास्य मानसिक समाधान देणारे असल्याचे सांगितले.रेशन दुकानदारांनी सर्व लाभार्थ्याना दिवाळीत किटचे वाटप करण्याच्या सुचना दिल्या.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी तालुक्यात अंत्योदय व बीपीएल धारक लाभार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध झालेले कीट याबाबत माहिती जाणून घेतली.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते लाभार्थ्याना किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,संस्थेचे अध्यक्ष मदनलाल भावसार,चिंतामण पाटील,विठ्ठल आंधळे यांचेसःपादाधीकारी व लाभार्थी उपस्थित होते.पुरवठा निरीक्षक संदीप निळे,अव्वल कारकून भाऊसाहेब वाघ यांचेसह महसूल कर्मचा-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

फोटो ओळी-एरंडोल येथे किटचे वाटप करतांना आमदार चिमणराव पाटील,प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार सुचिता चव्हाण,शालिग्राम गायकवाड व पदाधिकारी.

हे पण वाचा

टीम झुंजार