सावरगांव तेली येथील सरपंचांनी वसुलपात्र रक्कम भरणा न केल्याने कार्यवाही करण्यासाठी आम आदमी पार्टीचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार:- तालुक्यातील सावरगांव तेली ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी १४ वा वित्त आयोगातुन केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन भ्रष्टाचार सिध्द झाला असुन ग्रामपंचायत सचिव यांचेवर एकुण रक्कम ५५,७१५ / – रुपये एवढी वसुलपात्र रक्कम निघाली आहे . त्यानुसार सदर रक्कम सरपंच व सचिव यांना समप्रमाणात भरणा करण्याचे आदेश असतांना सुध्दा वसुलपात्र रक्कमेपैकी रु . २७,८५७ रुपये एवढी रक्कम भरणा केलेली आहे . परंतु या भ्रष्टाचारात निघालेली वसुलपात्र रक्कमेपैकी सरपंच यांना भरणा करावी लागणार रक्कम रु . २७.८५७ रुपये एवढी ” रक्कम सरपंच याना ७ दिवसाचे आत भरणा करण्याचे आदेश असतांना सुध्दा सरपंच यांनी सदर रक्कम अद्याप भरणा केलेली नसुन सरपंच यांनी शासनाचे व वरिष्ठ अधिकारी यांचे पत्रास न जुमानता त्यांचे पत्राचा अवमान करुन सदर रक्कमेचा भरणा केलेला नाही.सरपंच यांनी केलेला प्रष्टाचार सिध्द झाला असल्याने त्यांचेवर वसूली काढण्यात आलेली आहे.

सरपंच यांनी आज रोजी भ्रष्टाचार केला असल्याचे सिध्द झाल्याने त्यांना पुढील निवडणुक लढविण्यास अपात्र करण्यात यावे व फौजदारी कार्यवाही करावी.तसेच सरपंचांची वसुलपात्र रक्कम तात्काळ शासनखाती भरणा करून घ्यावी.

सदर प्रकरणासदंर्भात त्वरीत कार्यवाही करुन जनतेच्या हितासबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे.कार्यवाही न झाल्यास पुन्हा आम आदमी पार्टी चे वतीने कायदेशिर आंदोलन करण्यात येईल.अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या देण्यात आले आहे.


यावेळी अविनाश आडे, भानुदास एस.पवार जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा,सुनिल मोरे जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा,अँड दिपक मापारी जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा, अँड अमित दाभाडे , बुलडाणा ता.अध्यक्ष अविनाश आडे,तालुका अध्यक्ष प्रशांत सोनुने,सलीम पठाण,सईद शहा,गणेश कृपा राठोड, दिलिप राठोड सह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार