VIDEO: किड्यांमुळे २० ते २५ गाड्या घसरल्या; एक जण कारच्या चाकाखाली येऊन १० फूट फरफटत गेला

Spread the love


Maharashtra News: केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला यामध्ये कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली येथे हा प्रकार घडला.

कोल्हापूर :- कोल्हापुरातील शिरोली येथे अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथे उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल २० ते २५ गाड्या स्लिप झाल्याचा प्रकार घडला आहे. तर एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच स्लिप झाल्याने तो कारच्या चाकाखाली आला आणि जवळपास १० फुटांपर्यंत फरफटत गेला.

मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला यामध्ये कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली येथे हा प्रकार घडला.

पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ –

कोल्हापुरात सध्या परतीचा पाऊस सुरू आहे आणि यावेळी रात्रीच्या सुमारास उजेडाला आकर्षित होणारे किडे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे अनेक वाहन चालकांना याचा त्रास होत असून काल रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदीवरील पुल येथे धक्कादायक घटना घडली आहे.

रात्रीच्या सुमारास उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल २० ते २५ गाड्या स्लिप झाल्या. इतकेच नव्हे तर एका तरुणाची गाडी स्लिप झाल्याने सदर तरुण एका कार खाली आला आणि तब्बल १० फुटांपर्यंत फरफटत गेला. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून बचावला. मात्र, त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे..

हे वाचलंत का ?

टीम झुंजार