दिल्ली :- सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करण्याण्याची परंपरा कायम ठेवत, पंतप्रधानांनी ही दिवाळीसुध्दा कारगिलमध्ये सैन्यदलासोबत साजरी केली.शूर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कारगिलच्या भूमीवरची श्रद्धा नेहमीच त्यांना सशस्त्र दलातील शूर पुत्रांचे आणि कन्यांचे स्मरण देत आकर्षित करून घेते.

कारगिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच कारगिलमध्ये दाखल झाले असून ते भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी त्यांनी जवानांना संबोधित केले असून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य आहे अशा भावना मोदींनी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
“कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही” असं म्हणत नरेंद्र मोदींकडून कारगिलच्या विजयाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.
“तुम्ही आहात म्हणून सगळे भारतीय सुरक्षित आहेत. पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो आणि यामध्ये जवानांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे जवान हेच माझं कुटुंब आहे” असंही मोदी म्हणाले आहेत.
याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावर होती, ती आता पाचव्या स्थानावर आली आहे असं मोदी म्हणाले असून ते आज जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
“गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात, असे पंतप्रधान म्हणाले. जवानांच्या उपस्थितीत दिवाळीचा गोडी वाढते आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या दिवाळीच्या तेजाचा प्रकाश आमच्या आत्म्याला उत्साहीत करतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“एकीकडे राष्ट्राच्या सार्वभौम सीमा आहेत तर दुसरीकडे त्यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले सैनिक, एकीकडे मातृभूमीवरचे प्रेम आहे तर दुसरीकडे निधड्या छातीचे शूर वीर जवान. एवढा प्रचंड आनंद देणाऱ्या दिवाळीची अपेक्षा मी इतरत्र कुठेही करू शकणार नाही.” शौर्य आणि धाडस या आपल्या परंपरा आणि संस्कृती असून त्यांच्या गाथा संपूर्ण भारत आनंदाने साजऱ्या करतो, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. “आज, कारगिलच्या या पराक्रमी भूमीवरून, मी भारतातील आणि जगातील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले,
हे वाचलंत का ?
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.