पुणे : – सध्या देशात सर्वत्र दीवाळी मुळे आनंदाचे वातावरण आहे.अश्यातच कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनंतर काल सोमवारी दिवाळी सण निर्बंधमुक्तपणे पार पडला. अनेकांनी फटाके फोडून हा सण साजरा केला. पण, याचदरम्यान पुण्यातील एका मुलासोबत फटाका फोडतानाच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. रंगीबेरंगी अनारचा अचानक स्फोट झाला आणि त्यात एक लहान मुलगा जखमी झालाय. जखमी झालेल्या मुलाचं नाव शिवांश अमोल दळवी असं आहे. या स्फोटाच्या घटनेतून शिवांश अगदी थोडक्यात वाचला. तो जखमी झाल्यामुळे त्याचे पालकही धास्तावले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ IBNLokmat ने प्रसारित केला आहे. ही घटना सोमवारी घडली. सोमवारी लक्ष्मीपूजनानंतर शिवांश फटाके फोडत होता. त्यावेळी रंगीबेरंगी अनार लावताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात शिवांश जखमी झाला.
पहा व्हिडिओ :
आता शिवांशची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे आता इतर पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन केलं जातंय. लहान मुलांना शक्यतो एकटं फटाके फोडायला पाठवू नये, असंही गरज व्यक्त केली जातेय. फटाके फोडण्याच्या उत्साहावर गालबोट लागू नये, यासाठी अधिक खबरदारी बाळगावी आणि पालकांनी मुलांसोबत सतर्क राहावं, हे पुण्यातील घटनेनं अधोरेखित केलंय.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






