जळगाव : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून वाद झाला होता. आमच्या घरासमोर फटाके फोडू नये असा जाब विचारल्याने मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता, अशी माहिती मृताच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवार २५ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या या घटनेत चार जण जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-२० रा. सिकलकर वाडा, तांबापुरा), असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून याच परिसरात राहणाऱ्या बावरी भावंडांसोबत संजयसिंग याचा वाद झाला होता. तर, याच वादातून त्याचा २५ तारखेच्या रात्री खून झाल्याची माहिती मिळाली आहे.
मयताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून वाद झाला होता. आमच्या घरासमोर फटाके फोडू नये असा जाब विचारल्याने मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता.
या हल्ल्यात चौघे झाले जखमी
मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संजयसिंग हा घराबाहेर क्रिकेटच्या गप्पा करीत असताना मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. यात चौघे देखील जखमी झाले आहे.
दोन्ही गटांकडून झाली दगडफेक
घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती आहे. मयत आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयीत फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी झालेल्या वादावर एमआयडीसी पोलिसांनी वेळीच दखल घेत कारवाई केली असती तर आजचा प्रकार घडला नसता अशीही चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






