चोपडा :- भाऊ आणि बहिणीचा पवित्र उत्सव म्हणजे भाऊबीज असून गेल्या ४० वर्षांपासून खंड न पडू देता आवर्जून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणीकडून भाऊबीज निमित्ताने आज चोपड्यात आशिर्वाद घेतले आहेत.
पालकमंत्री पाटील यांच्या दोन्ही बहिणी चोपड्यात असून एक बहीण गणेश कॉलनी तर दुसरी बहीण सुंदरगढीत राहते.
ना गुलाबराव पाटील हे रक्षाबंधन व भाऊबीज या दोन्ही सणांना आवर्जून न चुकता चोपड्यात उपस्थित राहतात आणि बहिणींचा आशिर्वाद घेतात. सूंदरगढी येथील निर्जलाबाई देशमुख व गणेश कॉलनी भागात सुशीलाबाई गुर्जर या दोन्ही बहिणींची त्यांनी भेट घेतली. यावेळी धरणगाव येथील मोतीलाल पाटील,नारायण देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आबा देशमुख, माजी नगरसेवक महेश पवार, राजाराम पाटील,विजय देशमुख, भरत देशमुख,रोहित देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, कुठल्याच नात्यात भाऊ बहिणीच्या नात्याइतकी ओढ नसते, म्हणून भाऊबीज सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे
विद्यार्थी दशेपासून मी या ठिकाणी येत असतो. बहीण आणि भावाचे हे दृढ नाते जेव्हा आई नसते तेव्हा बहीणींचा सर्वात जास्त आधार मिळतो आणि तो मला देखील मिळाला आहे. आज जे मला यश आणि फलश्रुती मिळाली आहे त्यात जसे जनतेचे आशीर्वाद मिळाले आहेत तशाच प्रकारे मला बहिणींचा आशीर्वाद देखील मिळाला आहे.
— बेसंवेदनशिल माणसाने संवेदनशीलतेच्या गोष्टी करू नये … ना.गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना खोचक टोला…
ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला असंवेदनशील सरकार असल्याची टीका यावरून ना. गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी आदित्य ठाकरे यांना बेसंवेदनशील माणसाने संवेदनशीलतेच्या गोष्टी करू नये असा खोचक टोला लगावला आहे.तसेच अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात दौरे केले , किती आमदार व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या , किती शेतकऱ्यांच्या बांधावर गेले , या बाबींचा त्यांनी विचार करावा मग सरकारवर वर बोलावे असेही ना पाटील यांनी दिव्यमराठी शी बोलताना सांगितले.
पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांचा वाढदिवस केला साजरा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या सिक्युरिटी मध्ये असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांचा आज वाढदिवस होता तो वाढदिवस पालकमंत्री पाटील यांनी आपल्या बहीण निर्जलाबाई देशमुख यांच्या घरी केक कापून साजरा केला.