T20 विश्वचषक ! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा १०४ धावांनी केला पराभव

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : बुधवारी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे टी-२० विश्वचषकात आयर्लंडने डकवर्थ लुईस पद्धतीने इंग्लंडला पाच धावांनी पराभूत केले. आणि त्याच मैदानावर होणारा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ अंक देण्यात आला. त्यामुळे गट-१ मधील सर्वच संघांना उपांतफेरी गाठण्यासाठी अजूनदेखील समसमान संधी आहे.

गुरुवारी झालेल्या पहिल्या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा १०४ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका या विजयानंतर गट २ च्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २०५ धावा केल्या, ही आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. रिली रॉसॉवच्या ५६ चेंडूत १०९ धावा आणि क्विंटन डी कॉकच्या ३८ चेंडूत ६३ धावा काढल्या.

नंतर बांगलादेशला १६.३ षटकांत १०१ धावांत गुंडाळले. बांगलादेशकडून लिटन दासने (३४) सर्वाधिक धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी अॅनरिक नॉर्टजे (४/१०) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, तर तबरेझ शम्सी (३/२०) याने चांगली साथ दिली. बांगलादेशकडून शकीब अल हसन (२/३३), तस्किन अहमद (१/४६) आणि अफिफ हुसेन (१/११) यांनी विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या रिली रॉसॉवला त्याच्या १०९ धावांसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हे पण वाचा

 

टीम झुंजार