T20 विश्वचषक ! सर्वात मोठा उलटफेर झिम्बाब्वेने पाकिस्तानला १ धावेने हरवले

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुरुवारी झालेल्या टी२० विश्वचषक २०२२ च्या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला एका धावेने धक्का दिला. या T20 विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर आहे  नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना झिम्बाब्वेने १३०/८ धावा केल्या. शॉन विल्यम्स ३१ धावा काढल्या.

तर पाकिस्तानकडून शादाब खान ३/२३, मोहम्मद वसीम ४/२४ गडी बाद केले. शान मसूदने ३८ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. परंतु सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी आवश्यक असलेल्या तीन धावा करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला.

सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता ज्याने ३/२५ ब्रॅड इव्हान्स २/२५ बळी घेतले. सिकंदर रझाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतावर अवलंबून राहणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार