मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुरुवारी झालेल्या टी२० विश्वचषक २०२२ च्या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला एका धावेने धक्का दिला. या T20 विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर आहे नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना झिम्बाब्वेने १३०/८ धावा केल्या. शॉन विल्यम्स ३१ धावा काढल्या.
तर पाकिस्तानकडून शादाब खान ३/२३, मोहम्मद वसीम ४/२४ गडी बाद केले. शान मसूदने ३८ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. परंतु सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी आवश्यक असलेल्या तीन धावा करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला.
सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता ज्याने ३/२५ ब्रॅड इव्हान्स २/२५ बळी घेतले. सिकंदर रझाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतावर अवलंबून राहणार आहे.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.