प्री-वेडिंग शूट आणि वेडिंग फोटोशूट या गोष्टी भारतात खूप ट्रेंडमध्ये आहेत. लोकांना फोटोशूट करायला खूप आवडतं. हे फोटोशूट जोडप्याच्या नात्यातील सर्वात अविस्मरणीय आणि सुंदर काळ कॅप्चर करतात. या फोटोशूटद्वारे वधू-वरांना त्यांच्या लग्नाचे क्षण अधिक अधिक चांगले आठवतात. प्री वेडिंग फोटोशूट किंवा वेडिंग फोटोशूट वेळी कॅप्चर केलेल्या फोटोमुळे भविष्यात जेव्हा तुम्ही ही छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य वाढते. सध्या सोशल मीडियावर वेडिंग फोटोशूटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर बाईकवरून जबरदस्त स्टंट करताना दिसत आहेत.
वधू-वरांनी बाईकवर बसून स्टंट केला
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर दुचाकीवर बसून स्टंट करताना दिसत आहेत. मात्र, हे चित्रपटाचे शूटिंग आहे की प्री-वेडिंग शूट आहे, हे अजून पर्यंत समजलं नाहीये. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वधू-वर बाईकवर बसलेले आणि समोर एक चारचाकी गाडी उभी केलेली दिसत आहे. वधू आणि वर त्या गाडीला पार करण्यासाठी स्टंट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या मदतीसाठी एक जेसीबी मागवला जातो आणि त्यांना हवेत बांधून हवेत उडवले जाते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @bestofallll नावाच्या ट्विटर अकाऊंटने ते शेअर कारण्यात आला आहे. ही छोटी क्लिप ८ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि १४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा एक अॅक्शन डायरेक्टर वाटत आहे.’ दुसर्या युजरने लिहिले की, ‘यापेक्षा मी लग्न न केलेलेच बरे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘रिश्क है तो ही प्यार है’.