भाऊ बहिणीला घेऊन जात होता घरी, पण.. मामा-भाचीचा मृत्यू, चोपडा तालुक्यातील घटना

Spread the love

चोपडा : दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतानाचे दिसून येत आहे. अशातच अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे सहा वर्षाच्या भाचीसह मामाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यात घडलीय. विधी कोळी असे मृत चिमुकलीचे नाव आहे. अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावी झाली होती.

नेमकी काय आहे घटना?
आज शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एचआर 56 बी 4688) ने जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका जागीच ठार झाल्याचे कळते. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) आणि एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप असल्याचे कळते.

अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावी झाली होती. दरम्यान, शेवटची वृत्त हाती आले तेव्हा जखमी महिलेला जळगाव हलविण्यात आले होते. तसेच मयत हा आपल्या बहिणीला घेऊन विरवाडे ता. चोपडा येथून आपल्या घरी जात होता. असेही कळते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा घटनास्थळी सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी कर्मचारी जात पुढील कार्यवाही सुरु केली होती.

टीम झुंजार