जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजच्या शनिवार हा दिवस…
मेष |
शुभ रंग : केशरी, शुभ अंक : ३
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडिलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.
वृषभ |
शुभ रंग : जांभळा, शुभ अंक : ४
विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होईल. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.
मिथुन |
शुभ रंग आकाशी, शुभ अंक : ९
आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत मिळालेल्या संधींचे सोने करतील.
कर्क
शुभ रंग : हिरवा शुभ अंक : ६
स्थावर शेतीवाडी संबंधीत काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. आज प्रेमप्रकरणात फसवणूक संभवते.
सिंह |
शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ७
काम कमी दगदग जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल.
कन्या |
शुभ रंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
धंद्यात येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल. कार्यक्षेत्रात आज स्वत:चे महत्त्व सिद्ध करू शकाल.
तूळ |
शुभ रंग: लाल, शुभ अंक : २
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.
वृश्चिक |
शुभ रंग: सोनेरी, शुभ अंक : ५
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधावा.
धनू |
शुभ रंग:मरून, शुभ अंक : ३
आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवा.
मकर |
शुभ रंग : निळा, शुभ अंक : ४
पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.
कुंभ |
शुभ रंग: भगवा, शुभ अंक : १
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसांपासूनच्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन, वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. म्हणाल ती पूर्व कराल.
मीन |
शुभ रंग : गुलाबी, शुभ अंक : ८
उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनूकुल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






