वापी (गुजरात ) :- आजकाल प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असतं. मुली आणि महिलांच्या पाठोपाठच आता पुरुषही सातत्याने सलूनमध्ये जाऊन आकर्षक दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. सध्या वेगवेगळे हेअरकट्स आणि स्टाइल्स ट्रेंडमध्ये आहे. या स्टाइल्स करून पाहण्यासाठी तरुणही फारच उत्साही असतात. मात्र, सध्या एका उत्साही तरुणाला ट्रेंडी हेअरस्टाइल करणं खूपच महागात पडलं आहे. फायर हेअरस्टाइल करताना अचानकच या तरुणाच्या केसांना आग लागली. नेमकं काय घडलं पाहुयात.
गुजरातच्या वापी येथील एका तरुणाला फायर हेअरकट करणे फारच महागात पडले आहे. हा हेअरकट करत असताना अचानक केसांना आग लागल्याने हा तरुण गंभीररित्या जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायर हेअरकट करत असताना या मुलाच्या केसांना लावलेली आग अनियंत्रित झाली. बुधवार २६ ऑक्टोबरला ही घटना घडली. यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फायर हेअरकटमध्ये एका विशिष्ट प्रकारे केस कापले जातात आणि ते सेट करण्यासाठी आगीचा वापर केला जातो. यावेळी केसांना एक विशिष्ट प्रकारचे केमिकल लावले जाते जेणेकरून केस जळत नाहीत. मात्र, या तरुणाच्या केसांना कोणते केमिकल लावण्यात आले होते याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेचा बळी ठरलेल्या तरुणाला वापी येथील एक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याला वलसाड येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथून सूरतमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की केस कापणाऱ्याचा आणि पीडित मुलाचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटला आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले