Viral Video Of Girl Sitting on Railway Track Train Passed Over Her : तिच्याकडून थोडीही चूक झाली असती तर हा प्रसंग तिच्या जीवावर बेतणारा होता, मात्र याचे तिला काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते.
आपल्याला कितीतरी जन्म घेतल्यानंतर मानवाचा जन्म मिळतो असं म्हणतात. पण या जन्माबाबत आपण काहीसे बेजबाबदार असल्याचे दिसून येते. काहीवेळा आपण इतके निवांत असतो की एखाद्या घटनेमुळे आपला जीव जाऊ शकतो हेही आपल्याला लक्षात येत नाही. मात्र अशावेळी केलेला बेजबाबदारपणा आपल्या जीवावर बेतू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून कदाचित आपल्या काळजाचा ठोका चुकू शकतो. आता या व्हिडिओमध्ये असे काय आहे की ज्यामुळे असे होऊ शकते तर तो पाहिल्याशिवाय आपल्याला घटनेचे गांभिर्य लक्षात येणार नाही (Viral Video Of Girl Sitting on Railway Track Train Passed Over Her).
तर या व्हिडिओच्या सुरुवातीला एक ट्रेन अतिशय वेगाने येताना दिसते. ट्रेन जशी पुढे जाते तशी रल्वे रुळावरुन एक तरुणी उठताना दिसते. म्हणजे ट्रेन जात असताना ही तरुणी रेल्वे रुळांवर झोपलेली असते. विशेष म्हणजे ही तरुणी रुळांवरुन उठते तेव्हा तिच्या हालचालींमध्ये कुठेही घाबरल्याचे भाव नसतात. तर ही तरुणी चक्क निवांत फोनवर बोलत बोलत रुळांच्या बाहेर येते आणि प्लॅटफॉर्मवर येण्याचा प्रयत्न करते. या तरुणीला अशाप्रकारच्या अपघाताची जणू सवयच असल्याचे तिच्या निवांतपणातून दिसून येते. तिच्याकडून थोडीही चूक झाली असती तर हा प्रसंग तिच्या जीवावर बेतणारा होता, मात्र याचे तिला काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते.
पहा व्हिडिओ :
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ‘फोनवर गप्पा मारणे जास्त महत्त्वाचे आहे’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. अवघ्या २१ सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटवरवर जवळपास २ लाख जणांनी पाहिला असून अनेकांनी तो रीट्विटही केला आहे. तर काहींनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत तरुणीच्या बेजबाबदारपणाबद्दल तिला कमेंटसमधून खडे बोल सुनावले आहेत. आता ही घटना कोणत्या राज्यातील आणि कोणत्या रेल्वे स्टेशनवरील आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.